Video clip

कोकणचो टायपोग्राफर ! | Conversation With Siddhesh Nerurkarसिद्धेश नेरुरकर हा तरुण उपयोजित चित्रकार मूळचा कोकणातला, म्हणजे सावंतवाडीचा. शिक्षण घेतल्यावर त्यानं भरपूर कामं केली, नोकऱ्या बदलल्या, थोडं बहुत नाव देखील कमावलं. पण एके दिवशी त्याच्या मनात असं आलं की, ज्या कोकणात आपण जन्मलो, लहानाचे मोठे झालो त्याच कोकणातल्या गावांची नावं घेऊन काही टायपोग्राफीचे प्रयोग केले तर ? हा विचार मनात आला आणि त्यानं पहिलं गाव निवडलं ते ‘मालवण’. त्यानं केलेलं डिझाईन लोकांना प्रचंड आवडलं. इतकं की फेसबुकवर ते पडताच चक्क व्हायरल झालं आणि मग एका पाठोपाठ एकेका गावाची आवतणं त्याला यायला लागली आणि बघता बघता तो फेसबुक सेलिब्रिटी झाल���. कोकणातले तर शेकडो ग्रुप्स फेसबुकवर कार्यरत आहेत, त्यांनी त्याच्या कामाला इतकं उचलून धरलं की ‘चिन्ह’ला त्याला या कार्यक्रमात बोलावल्याशिवाय राहवेना. त्यांच्यासोबतच्या ‘गप्पा’ ऐकायला विसरू नका.

Trả lời

Email của bạn sẽ không được hiển thị công khai. Các trường bắt buộc được đánh dấu *

Back to top button